होळी हा आनंदाचा सण आहे.लोक होळीची तयारी करत आहेत. या उत्सवात लोक त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटतात. ते एकमेकांना रंग लावतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची चव घेतात. रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तरी ही अद्याप कोरोना गेला नाही. कोरोनाकाळात होळी साजरी करताना लहान मुलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, गरोदर महिलांनी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे. विशेषतः गरोदर महिलांनी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे. जेणे करून या आनंदाचा सणात कोणताही व्यत्यय येऊ नये. या होळी ला गरोदर महिलांनी स्वतःची अशा प्रकारे काळजी घ्यावी .
1 गरोदर महिलांनी नाचू नये- होळीचा सण उत्साहाचा आनंदाचा आणि जल्लोषाचा आहे. अशा परिस्थितीत लोक या दिवशी मोठया आवाजात डीजे लावतात आणि नाचतात. गरोदर महिलांनी उत्साहात येऊन नाचणे टाळावे. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी लोक डीजे वर गाणे लावून नाचत असतील त्या ठिकाणापासून दूर राहा. इतर लोक नाच करताना त्यांचा धक्का आपल्याला लागू शकतो.