निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्या कडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. असे न केल्यास आपल्या आरोग्यास परिणाम होतो. रात्रीच्या जेवण्यात म्हणजे डिनरमध्ये काही गोष्टीना घेणं टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आज आम्ही आपल्या या लेखामधून सांगणार आहोत की आपल्याला डिनरमध्ये कोणत्या गोष्टी घेऊ नये. ज्या घेतल्यावर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला, तर मग जाणून घेऊया डिनर मध्ये काय सेवन करु नये.
* मसालेदार किंवा चमचमीत जेवण घेणं टाळा -
डिनरमध्ये जास्त चमचमीत जेवण घेणं टाळावं. जास्त मसाल्याचं जेवण केल्याने पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. मसालेदार अन्न पचायला उशीर लागतो, यामुळे डिनर मध्ये मसालेदार अन्न घेणं टाळावं.
* ब्रोकोलीचं सेवन करू नका -
ब्रोकोली आरोग्यास खूप फायदेशीर आहे, पण रात्रीच्या वेळी ब्रोकोलीचं सेवन करू नये. ब्रोकोलीत फायबर मोठ्या प्रमाणात आढळतं, त्यामुळे ब्रोकोलीला पचण्यासाठी वेळ लागतो.
* तळलेले अन्न घेणं टाळा -
डिनरमध्ये फ्राईड फूड म्हणजेच तळलेलं अन्न घेणे टाळावं. रात्री तळलेले अन्न घेतल्यानं एसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास उद्भवू शकतो. रात्री हलके आणि सौम्य जेवण करावं.