तुळशीच्या पानांनी होणारे 5 आश्चर्यात टाकणारे फायदे

बुधवार, 29 एप्रिल 2020 (19:55 IST)
तुळशीच्या पानांचा वापर आपण निव्वळ पूजेसाठीच वापरतो असे नाही. आयुर्वेदामध्ये तुळशीचे गुणधर्म सांगितले आहे. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला मग बघू या तुळस आपल्यासाठी किती फायदेशीर आहे ते...
1 तुळशीच्या पानात अँटी ऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक क्षमतेला वाढविण्याचे काम करते.
 
2 आपल्याला सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास खडी साखर, काळे मिरे आणि तुळशीच्या पानांना पाण्यामध्ये उकळवून काढा करावा आणि त्याचे सेवन करावं, किंवा आपण ह्या काढ्याचा घोळ वाळवून ह्याचा बारीक बारीक गोळ्या बनवून खाल्ल्या मुळे सर्दी, पडसं आणि तापा मध्ये फायदेशीर आराम होईल.
 
3 ज्यांच्या तोंडाला वास येतो त्यांनी दररोज सकाळी उठल्यावर तुळशीचे पान तोंडात ठेवायला हवे. असे केल्यास तोंडाच्या वास येणे कमी होते.
 
4 शरीरावर कुठेही जखम झाल्यास तुळशीच्या पानांना तुरटीबरोबर जखमेवर लावल्याने जखम लवकरच बरी होते.

5 जुलाब लागले असल्यावर तुळशीच्या पानांमध्ये जिरे टाकून वाटून घ्यावे. या मिश्रणाला दिवसभरातून 3 - 4 वेळा चाटून घेणे असे केल्यास आपल्याला जुलाब बंद होण्यात फायदाच होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती