पपईच्या पोषणामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक आरोग्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. पण जर तुम्ही कच्च्या पपईचे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते आरोग्याला हानी देखील होऊ शकते.
कच्ची पपई जास्त प्रमाणात खाल्ल्याने दम्याच्या रुग्णांना त्रास होतो.
कच्च्या पपईमुळे अनेक वेळा ऍलर्जी होऊ शकते. याने पोट फुगणे, डोकेदुखी, पुरळ उठणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशात डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.