दिवाळी म्हटली की स्वयंपाकघरात घमघमाट सुटतो.... बायका मन लावून दिवाळीचा फराळ तयार करण्यास सुरु करतात. चकल्या, करंज्या, शंकरपाळी, मठरी, शेव तयार करण्यासाठी अगदी उत्तम दर्जेच्या वस्तू वापरल्या जातात..मात्र एक मोठी चूक घडते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्र वापरण्याची. जर आपणही ही चूक करत असाल तर याकडे दुर्लक्ष करु नका. कारण यामुळे गंभीर आजाराचा धोका असतो.
दिवाळीत तयार केले जाणारे अनेक पदार्थ तळलेले असतात आणि अशात तेल टिपण्यासाठी अनेक जण घरात रद्दी म्हणून पडलेले असणारे कागद किंवा वर्तमानपत्र वापरतात. त्यावर पदार्थ पसरवले जातात आणि गार झाल्यावर डब्ब्यांमध्ये भरले जातात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. कारण यासाठी वापरली जाणारी शाही आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.