मधुमेही रुग्ण ही 7 फळे काळजी न करता खाऊ शकतात, शरीराला मिळेल फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि साखरही नियंत्रणात राहील

बुधवार, 1 डिसेंबर 2021 (11:56 IST)
भारतात मधुमेहाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. एखाद्याला या समस्येचे निदान झाले की, त्याच्याकडे नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींकडून हे खा, हे खाऊ नका, अशा सूचनांची लांबलचक यादी असते. फळांबद्दल बोलताना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला सर्वांकडून ऐकायला मिळतो. पण मधुमेहींनी खरंच फळांपासून दूर राहावं का? याबाबत आहारतज्ञ काय म्हणतात हे जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे.
 
काही सावधगिरीने फळांशी मैत्री सुरू ठेवा
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. हे पोषक घटक आपल्याला केवळ चार्ज ठेवत नाहीत तर रक्तातील साखर नियंत्रित करून टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करतात. त्याचबरोबर फळांबाबतचा संभ्रम दूर करण्याची गरज असल्याचे म्हटले जातं. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले तर टाइप 1, टाइप 2, तुमचा प्रीडायबेटिसपासून बचाव होईल आणि तुम्ही सक्षम होऊ शकता. 
 
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
फळे चावून खाणे महत्वाचे का आहे? यावर तज्ञांप्रमाणे फळे चांगल्या प्रकारे चावून- चावून खावीत. साखरेचे रुग्ण फळांचे ज्यूस काढत नाहीत किंवा टेट्रा पॅक ज्यूस पीत नाहीत. कारण फळे चावून खाल्ल्यानंतर त्यातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर देखील शरीरात जातात, तर रस काढल्याने त्यांचे प्रमाण कमी होते. तसेच फळे खाल्ल्याने फळांची साखर शरीरात हळूहळू विरघळते, तर रस प्यायल्याने रक्तातील साखर अचानक वाढते.
 
मधुमेहाच्या रुग्णांनी ही फळे जरूर खावीत
मधुमेहाच्या रुग्णांनी सफरचंद, पेरू, द्राक्षे, संत्री, किवी आणि डाळिंब खावेत. या फळांमध्ये भरपूर फायबर आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात. वास्तविक, ग्लायसेमिक इंडेक्सद्वारे, कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर दोन तासांनंतर शरीरात साखर किती वाढली आहे हे कळते. इंडेक्स जितका कमी तितकी साखर कमी आणि फायबर जास्त असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती