कोरोना विषाणूंची भीती सर्वत्र व्याप्त आहे. काही लोकांनी या भीतीपोटी राखीचा सण देखील साजरा केलेला नाही तसेच इतर सण उत्सव देखील मंदावले आहे. आता येणारा काळात एकामागून एक सण येणार आहे. तसेच आपल्याला आपल्या प्रियजनांशी भेटावेसे वाटत असणारच, कारण लॉक डाऊनमुळे आपण बऱ्याच दिवसापासून कोणाला भेटलेले नाही.
कोरोना विषाणूमुळे, प्रत्येक व्यक्तीच्या मनात भीती आहे की तो कोरोनाचा बळी तर पडणार नाही. त्याच वेळी सण सुरू झाले आहेत, अश्या वेळी जे लोकं एकमेकांना भेटू शकले नाही, ते आपल्या नातेवाइकांना भेटायला जाण्याचा विचार करीत आहे, कारण लॉक डाऊनमुळे ते बराच काळ भेटू शकले नाही. पण जेव्हा आपण एखाद्याला भेटावयास जाता तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारणं सुरक्षितता आणि सावधगिरीमुळे कोरोना पासून वाचणं शक्य आहे.