1 आपण सकाळी 8 ते 9 दरम्यान कॉफी पीत असाल तर आपल्याला माहीत असावं की या दरम्यान स्ट्रेस हार्मोन कार्टीसोल आपल्या उच्च स्तरावर असतं. याने ताण कमी होण्याऐवजी वाढतं.
2 एखाद्या ठराविक वेळेवर कॉफी पिण्याची सवय आपल्यासाठी योग्य नाही. याने गरज नसली तरी अधिक प्रमाणात कॅफीन ग्रहण करणे एका प्रकाराचे व्यसन आहे.
3 आपण सकाळी 10 ते 11:30 या दरम्यान कॉफी पिणे पसंत करत असाल तरी ही उत्तम वेळ आहे जेव्हा कार्टीसोल स्तर कमी असतं. या वेळेस कॉफी पिणे आपल्यासाठी सुरक्षित आहे.
4 दुपारी 12 ते 1 कार्टीसोल स्तर पुन्हा वाढतं म्हणून या दरम्यान कॉफी पिणे नुकसानदायक ठरेल.
5 दुपारी 1 पासून कार्टीसोल स्तर कमी व्हायला लागतं म्हणून 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉफी पिण्याची उत्तम वेळ आहे जेव्हा कॉफी नुकसान न करता ऊर्जा प्रदान करेल.
6 अनेक लोकांना जेवताना किंवा जेवण्याच्या आधी किंवा नंतर कॉफी पिण्याची सवय असते. असे करणे नुकसान करतं कारण याने शरीरात आयरनचे शोषण बाधित होतं.
7 जेवल्यानंतर कॉफीचे सेवन करण्यात किमान एक तासाचा अंतर असावा. आपण अॅनिमिक असाल तर हे अधिक आवश्यक होऊन जातं. तसेच संध्याकाळनंतर कॉफी पिणे झोपेत व्यवधान उत्पन्न करू शकतं.