चमचमीत फोडणी द्या, आरोग्य सुधारेल

कोणत्याही पदार्थांला चमचमीत बनविण्यासाठी त्यात फोडणी घातली जाते ज्याने सर्व मसाल्यांचा स्वाद त्यात मिसळला पाहिजे. पण आपल्याला हे माहीत आहे का फोडणी देण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या असेच 5 फायदे:
 
1 फोडणीमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि यामुळे इन्फेक्शन आणि सर्दी-खोकल्यापासून बचावा होतो. याचे मुख्य कारण यात लसणाचा वापर. लसूण आरोग्यासाठी उत्तम असतो.
 
2 हे आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये होणार्‍या वेदनांपासून मुक्ती देतं. कारण यात अख्खे मसाले, जसे लाल मिरची, काळी मिरे इतर मसाले वापरले जातात जे व्हिटॅमिन्ससह वेदनांपासून मुक्ती देतात. लठ्ठपणावर ही उपयोगी आहे.
 
3 फोडणीत पडणार्‍या मोहर्‍या, जिरा याने पचन संबंधी समस्या सुटतात. यासह याने स्नायू आणि हाडांमध्ये होणार्‍या वेदनांपासून सुटकारा मिळतो. एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि इम्यून पावर वाढवण्यात ही मदत करतं.
 
4 कढीपत्ता घातल्याशिवाय फोडणीला स्वाद नाही. स्वादासह पत्ता अनेक व्हिटॅमिन्स प्रदान करतं आणि पचन तंत्र व हृद्याचे आरोग्य सुरळीत ठेवण्यात मदत करतं. मधुमेहापासून बचावासाठी तसेच केस काळे ठेवण्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.
 
5 फोडणीत हळद वापरल्याने इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि अँटीबायोटिक तत्त्व, रोग प्रतिकार क्षमता वाढून आरोग्याची रक्षा होते. याने सर्दीपासून देखील बचाव होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती