आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे "आरोग्य धन संपदा". सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घालते आहे. ह्या आजाराशी लढण्यासाठी आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला हवी. त्यासाठी सकस आणि उत्तम आहार तर घ्यावयाला हवे. ज्यांचा शरीरात इम्युनिटी कमी असते त्यांना कुठलाही आजार लवकर होतो. आजाराचा दुष्प्रभाव आपल्यावर होऊ नये त्यासाठी सगळे प्रयत्नशील आहे आणि असतात.
आपल्या शास्त्रामध्ये देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबद्दलचे सांगितले आहे. आपल्या स्वयंपाकघरातसुद्दा काही पदार्थ आहे ज्यांच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आणि ते प्रत्येकाचा घरात सहजच सापडते. ते आहे हळद. होय, आपल्या दैनंदिन स्वयंपाकात वापरली जाणारी हळद. हळद आपल्या स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक आहे.
हळदीत करक्युमिन नावाचं तत्व असतं. त्यामुळे हळद अँटी इंफ्लेमेटरी, अँटिसेप्टिक आणि अँटीबेक्टेरिअलच्या गुणांनी समृद्ध असते. हळदीत असलेले करक्युमिनमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे गुण असते. त्यामुळे शरीराचं रक्षण होतं.
करक्युमिन हे झाडांमधून उत्त्पन्न होणारं रसायन आहे ज्यात उपचारासंबंधी अनेक गुण असतात. हळद सर्दी, पडसं, ताप, श्वास घेण्यात त्रास, अस्थमा, जळजळ होण्या सारखे आजाराशी लढण्याचे कार्य करते. त्यासाठी आपल्या जेवण्यात हळदीचा वापर करावा आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावी. दररोज असे केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि शरीर निरोगी राहील.