हिवाळ्यात या गोष्टींचे सेवन टाळा

शनिवार, 9 जानेवारी 2021 (12:56 IST)
बदलत हवामानामुळे सर्दी पडसं होतं, पण आपण जे काही खातो त्यामुळे देखील सर्दी-पडसं होऊ शकतं. जसे की दूध, जरी दूध आपली हाडे बळकट करणचे काम करते.
 
तरी सर्दी पडसं किंवा खोकला असेल तर दुधाचे सेवन आपला त्रास वाढवते. डेअरीच्या पदार्थांमुळे शरीरात कफ बनतो म्हणून दूध पिण्याचा सल्ला तेव्हाच दिला जातो. ज्यावेळी  सर्दी-पडसं नसेल. सर्दी पडसं असल्यावर तळलेले जंक-फूडचे सेवन करीत असाल तर यामुळे आपले त्रास वाढतात. आइसक्रीम, बर्गर, केक, बिस्किटांपासून लांब राहणेच योग्य आहे, कारण या जंकफूडमध्ये असलेले तेल कफ बनविण्याकत महत्त्वाची भूमिका निभावते. या तेलाचे सेवन केल्याने शरीरातील चरबी देखील वाढू शकते. तसेच नाकातून पाणी गळण्याचे कारण तिखट आणि मसालेयुक्त पदार्थांचे सेवन हेदेखील असू शकते. 
 
आजच्या काळात शरीरात प्रतिकारक प्रणाली बळकट होणं महत्त्वाचे आहे, कारण जर प्रतिकारक शक्ती कमकुवत  असेल तर आपण कोरोना विषाणू सारख्या बर्याच गंभीर आजाराला बळी पडू शकतो. म्हणून जर जास्त प्रमाणात साखर घेत असाल तर हे हानिकारक होऊ शकते. साखर शरीरात सूज येण्याला कारणीभूत असू शकते. जास्त प्राणात साखर घेतल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती