* भेंडी चिरताना सुरीवर लिंबाचा रस लावा या मुळे भेंडीचे तार सुटत नाही.
* हिरव्या मिरचीचे देठ कापून फ्रीज मध्ये ठेवल्याने हिरव्या मिरच्या लवकर खराब होत नाही.
* पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेले बटाटे किसून घाला.
* भजे करताना त्याच्या घोळात चिमूटभर आरारूट आणि गरम तेल घाला भजे अधिक खमंग आणि चविष्ट बनतात.