लठ्ठ आणि वृद्ध व्हाल जर हे 9 पदार्थ खाल

बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (15:08 IST)
असे काही खाद्यपदार्थ आहेत जे सतत खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि वेळेआधी म्हातारपण येते-

1. प्रोसेस्‍ड फूड– या प्रकाराच्या पदार्थांमध्ये न्यूट्रिशन नष्ट होऊन जातात.
 
2. जंक फूड– यात वापरण्यात येणारा मैदा हळूहळू पोटात जमा होऊ लागतो. त्यामुळे वजन वाढते.
 
3. फ्राइड फूड– तेलकट पदार्थ जसे फ्रेंच फ्राइस, बटाटा वडा, समोसे इतर.. वाढत्या कोलेस्ट्रॉलसोबत वजनही वाढते.
 
4. व्हाईट ब्रेड– पांढर्‍या ब्रेडचे ग्‍लाइसेमिक इंडेक्‍स अधिक असतं. याचे दररोज सेवन केल्याने वयाच्या आधी तुम्ही म्हातारे दिसायला लागाल.
 
5. साखर – साखरेचे अधिक सेवन केल्याने अकाली वृद्धत्व होते. मधुमेहाचा धोकाही असतो.
 
6. चहा- कॉफी– यात कॅफीनचे प्रमाण अधिक असल्याने चेहर्‍यावर रेषा, डोळ्यांजवळ सुरकुत्या, काळी वर्तुळे या सारख्या समस्या उद्भवतात.
 
7. दारू– अल्कोहलमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. शरीरात कोलेजनची कमतरता, पाण्याची कमतरता आणि व्हिटॅमिन एची गुणवत्ता कमी होते.
 
8. जास्त आचेवर शिजवलेले पदार्थ - यामुळे तुमचे वय झपाट्याने वाढते. तसेच हाय हिटवर शिजवलेल्या अन्नातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात.
 
9. मीठ – मीठामध्ये सोडियम असते. याच्या अतिसेवनाने शरीरातील पेशी आकुंचन पावतात.
 
डिस्क्लेमर– आरोग्याशी संबंधित उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून पाहावेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती