या प्रकारे ओळखा भेसळयुक्त दूध

दररोज दूध पिणे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे आपण लहानपणापासून ऐकले आहेत. अनेक लोकांना दररोज दूध पिण्याची सवय देखील असते. ही सवय तर चांगली आहे परंतू आपण सेवन करत असलेलं दूध भेसळयुक्त तर नाही हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर जाणून घ्या भेसळयुक्त दूध कशा प्रकारे ओळखता येईल ते-
 
अनेकदा फायद्यासाठी दुधात डिटर्जेंट आणि युरिया सारखे रासायनिक पदार्थ मिसळले जातात. आपण दूध पोषणासाठी पित असला तरी यातील भेसळ आपल्याला आरोग्यावर दुष्परिणाम टाकू शकते म्हणून हे तपासून घेणे आवश्यक आहे.
 
या प्रकारे ओळखा दुधात डिटर्जेंट असल्यास-
5 ते 10 ml दूध आणि समप्रमाणात पाणी घ्या. व्यवस्थित मिसळून घ्या. दुधात डिटर्जेंट असल्यास मिश्रणात दाट फेस दिसून येईल. भेसळ नसल्यास केवळ एक पातळ थर दिसून येईल.
 
या प्रकारे ओळखा दुधात स्टार्च असल्यास- 
2-3 ml दुधात 2-3 ड्रॉप टिंक्चर आयोडीन मिसळा. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्च असल्याचे जाणून घ्या.
 
भेसळयुक्त दुधात अनेकदा डिटर्जेंट, कास्टिक सोड, ग्लूकोज, पांढरा पेंट आणि रिफाइंड ऑयल मिसळतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती