कोणतेही तांदूळ शुगर-फ्री नाही, ब्राउन राईस कोलेस्टेरॉल-मुक्त असल्याचा दावा देखील चुकीचा

बाजारात महाग किमतीत विकले जात असलेले ब्राउन राईस बद्दल दावा केला जातो की हे तांदूळ शुगर-फ्री असून यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण नाही किंवा अगदी कमी प्रमाणात आहे. परंतू याच्या अगदी उलट मद्रास डायबिटिक रिसर्च फाउंडेशन (एमडीआरएफ) च्या एका शोधात दावा केला गेला आहे की कोणतेही तांदूळ शुगर-फ्री नसू शकतो.
 
यात शोधात सांगितले गेले की महागडे ब्राउन राईस वास्तविकतेत पॉलिश केलेले आणि पांढरे देखील असू शकतात. या व्यतिरिक्त कोलेस्टेरॉल मुक्त आणि शुगर-फ्री असल्याचा दावा करत विकले जात असलेले तांदूळ देखील अर्धे उकळलेले असतात.
 
एमडीआरएफच्या वैज्ञानिकांनी या शोधासाठी चेन्नईच्या अनेक जागेहून 15 वेगवेगळ्या प्रकाराचे ब्राउन राईसचे नमुने घेतले. तपासणीत शुगर-फ्री आणि कोलेस्टेरॉल मुक्त असल्याचा दावा करत विकले जात असलेले तांदूळ देखील अर्धे उकळलेले होते.
 
या व्यतिरिक्त हे तांदूळ शिजवताना अधिक प्रमाणात पाणी शोषून घेतात ज्यामुळे यात स्टार्चचे प्रमाण वाढतं. तांदळात स्टार्च वाढल्याने ग्लिसेमिक इंडेक्समध्ये देखील वाढ होते. वैज्ञानिकांप्रमाणे कमी ग्लिसेमिक इंडेक्स असलेले खाद्य पदार्थ शरीरासाठी फायदेशीर असतात.
 
ग्लिसेमिक इंडेक्सने तांदुळातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण माहीत करता येतं. जर तांदळात कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक आहे तर सेवन करणार्‍या व्यक्तीच्या रक्तात ग्लूकोजचे प्रमाण प्रभावित होतं.
 
शोधकर्त्यांप्रमाणे तांदळाचा स्टार्च पचनावेळी ग्लूकोजमध्ये परिवर्तित होतं. म्हणून कोणताही तांदूळ शुगर-फ्री असू शकतं नाही. कमी पॉलिश असलेल्या तांदुळात अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेट आढळतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती