बर्ड फ्लू म्हणजे काय? लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

बुधवार, 27 एप्रिल 2022 (12:52 IST)
सध्या देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असता आता चीन मध्ये बर्ड फ्लूचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.  चीनने मानवांमध्ये एव्हीयन फ्लूच्या H3N8 स्ट्रेनच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली आहे. स्थानिक आरोग्य अधिकारी म्हणतात की लोकांमध्ये हा फ्लू पसरण्याचा धोका कमी आहे. जे विषाणूजन्य संसर्ग पसरवून पक्ष्यांना संक्रमित करतात. दुसर्‍या भाषेत,  हा पक्षी आणि मानव दोघांनाही आपल्या कवेत घेऊ शकतात.
 
बर्ड फ्लू माणसांमध्ये कसा पसरू शकतो?
1  जेव्हा व्यक्ती संक्रमित कोंबडी किंवा इतर पक्ष्यांच्या जास्त संपर्कात असते तेव्हा ही समस्या उद्भवू शकते.
2 जेव्हा व्यक्ती बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांचे मांस (कच्चे मांस) खातात तेव्हा ही समस्या उद्भवू शकते.
3 कोंबडी किंवा पक्षी जिवंत असो वा मेला, हा विषाणू डोळे, नाक किंवा तोंडातून माणसांमध्येही पसरू शकतो.
4 ही समस्या त्या व्यक्तीने संक्रमित पक्षी ची विष्ठा साफ केली तरीही होऊ शकते.
5 ही समस्या संक्रमित पक्ष्याच्याओरबाडल्यामुळे मुळे देखील होऊ शकते.
 
 
बर्ड फ्लूची लक्षणे
1 ताप येणे
2 स्नायूंमध्ये वेदना जाणवणे.
3 सतत वाहणारे नाक.
4 खोकल्याची समस्या.
5 खालच्या ओटीपोटात वेदना जाणवणे.
6 डोकेदुखीचा त्रास होतो.
7 डोळ्यांचा लालसरपणा (नेत्रश्लेष्मलाशोथ)
8 जुलाब होणे
9 मळमळ किंवा उलट्यासारखे वाटणे.
10 घशात सूज येणे .
 
 
बर्ड फ्लूचे उपाय -
1 पाळीव प्राणी घरात ठेवू नका. त्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या. पक्ष्याला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा. 
2  खुल्या बाजारातून किंवा अस्वच्छ जागेतून मांस खरेदी करणे टाळा. 
3 कच्चे मांस खाणे टाळा. 
4 हात -वारंवार धुवा.स्वछता राखा. 
5  बाहेर जाताना मास्क वापरा. 
6  स्वच्छतेची काळजी घ्या. घराभोवती स्वच्छता ठेवा. 
7 योग्य आहार घ्या, द्रव्य घ्या.
8 व्यायाम आणि योगा करा. 
9 मद्यपान करणे, तंबाखुचं सेवन करणे टाळा. 
 
बर्ड फ्लूचे वैद्यकीय उपचार
1 ही समस्या अँटीव्हायरल औषधांद्वारे प्रगती करण्यापासून रोखली जाते.
2 डॉक्टर व्यक्तीला विश्रांती घेण्याचा सल्ला देतात.
3 या समस्येदरम्यान, व्यक्तीने निरोगी आहार घेतला पाहिजे.
4 एखाद्याने अधिक द्रवपदार्थ घेतले पाहिजेत.
5 बर्ड फ्लू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, असे सिद्ध करणारे एकही प्रकरण आतापर्यंत समोर आलेले नसले, तरी डॉक्टर रुग्णाला दूर राहण्याचा सल्ला देतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्फ्लुएंजा लस घ्या, बर्डफ्लूची लक्षणे आढळ्यास 48 तासात डॉक्टरांशी संपर्क करा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती