चांगला खेळणारा एखादा खेळाडू टीममध्ये दिसत नाही तेव्हा तो आजारी का पडला, याबाबत चाहते जिज्ञासा दाखवतात. अशावेळी बरेचदा लेग स्ट्रेन (पायात लचक भरणे) हे कारण सांगितले जाते. खेळाडूंना असा त्रास उद्भवल्यास आपण समजू शकतो, कारण खेळताना केलेल्या हालचालींवरून त्यांना लेग स्ट्रेनला केव्हाही बळी पडावे लागू शकते. परंतु मैदानावर कधीही पाऊल न ठेवणार्या लोकांनाही आता लेग स्ट्रेनचा त्रास उद्भवू लागला आहे.
पायांच्या एखाा स्नायूवर मर्यादेपेक्षा जास्त ताण पडत असेल किंवा ते आकसतात, तेव्हा लेग स्ट्रेन असे म्हणतात. पायाच्या कोणत्याही स्नायूवर असा ताण पडू शकतो. विशेषतः मांड्यांमध्ये हॅम स्ट्रींग, क्वाड्रिसेप्स आणि अॅडक्टर हे बळकट स्नायूंचे तीन स्तर असतात.
कधीही व्यायाम न करणार्यांनी विशिष्ट हालचाली केल्यास किंवा जोर्यात धावणे,उडी मारणे अशा माफक हालचाली केल्यासही लेग स्ट्रेन उद्भवू शकतो. लेग स्ट्रेन झालेल्या पायावर वजन टाकण्याऐवजी काही दिवस आराम करायला हवा. सूज कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे बँडेज बांधावे. झोपताना पाय उंचीवर ठेवावा, असा त्रास उद्भवू नये म्हणून नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.