वजन कंट्रोलमध्ये ठेवायचे तर रात्री करू नाही ह्या चुका!

मंगळवार, 21 मार्च 2017 (15:28 IST)
नेहमी आम्ही रात्री झोपण्याअगोदर काही अशा चुका करतो ज्यामुळे आमचे वजन वाढत. आम्ही तुम्हाला सांगत आहो अशा काही चुका ज्यांना अवॉइड करून तुम्ही वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता.  
 
डिनर न करणे
याने मेटाबॉलिझम स्लो होऊन जात. सकाळी भूक जास्त लागते आणि तुम्ही जास्त खाता.  
काय करावे – जर रात्री जास्त भूक नसेल तर सलॅड, फ्रूट किंवा दह्याचे सेवन करावे.  
 
डिनरमध्ये जास्त कार्बोहाइड्रेट असणार्‍या अन्नाचे सेवन  
पिझ्झा, पास्ता सारखे कार्बोहाइड्रेट्स असणार्‍या भोजनात कॅलोरी जास्त असते. रात्री खाल्ल्याने फॅट वाढत.  
काय करावे – रात्री प्रोटीन असणारे अन्नपदार्थ, वेजिटेबल्स आणि फ्रूटचे जास्त सेवन करावे.  
 
डिनरमध्ये ओवरईटिंग
रात्री डायजेशन स्लो होऊन जात. यात कॅलोरी बर्न होत नाही आणि बॉडीत फॅट जमू लागत.  
काय करावे – टीव्ही बघताना डिनर करू नये. प्रोटीन आणि वेजिटेबल्स जास्त प्रमाणात घ्या.  
 
जेवताच झोपणे  
यामुळे बॉडीला कॅलोरी बर्न करणे आणि डायजेशनसाठी वेळ मिळत नाही.  
काय करावे – झोपण्याच्या 3-4 तास आधी डिनर करावा. डिनर नंतर वॉक नक्की करावी.  
कॉफी किंवा अल्कोहलचे सेवन
यामुळे झोपेची समस्या येऊ शकते. एम्प्टी कॅलोरीजमुळे वजन वाढत.  
काय करावे – एक कप ग्रीन टीचे सेवन करावे. साखर कमी घ्या किंवा नाही घेतले तरी चालेल.  
 
आइसक्रीम किंवा जास्त गोडाचे सेवन
गोडात कॉफीमध्ये जास्त कॅलोरीज असते. यामुळे बॉडीत फॅट डिपॉझिट वाढत.  
काय करावे – गोडाचे सेवन कमी करावे. डॅजर्टमध्ये फ्रूट सलाडाचे सेवन करावे.   
 
रात्री उशीरापर्यंत जागणे
झोप पूर्ण न झाल्याने मेटाबॉलिझम स्लो होतो, फॅट बर्न होत नाही. भूक जास्त लागते.  
काय करावे – रोज 6-8 तासांची झोप गरजेची आहे. झोपण्याची वेळ निश्चित करावी.  
 
डिनरमध्ये जास्त फ्राइड फूड घेणे
यात फार जास्त कॅलोरी असते. रात्री बॉडी यांना बर्न करू शकत नाही.  
काय करावे – बेक्ड किंवा ग्रिल्ड फूडचे सेवन करावे.  
 
डिनरनंतर देखील स्नेक्स खाणे
यामुळे ओवरईटिंग होऊन जाते. स्नेक्समध्ये एम्प्टी कॅलोरीज असते जी वजन वाढवते.  
काय करावे – डिनरनंतर काही ही खायची सवय बदलायला पाहिजे. सौंफ किंवा लवंग-वेलची चघळायला पाहिजे. 

वेबदुनिया वर वाचा