कारणं दातदुखीची

अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. कॅव्हिटीमुळे दातदुखीची समस्या निर्माण होते हे खरे असले तरी यामागे इतर काही कारणेही असू शकतात. 
 
* दातांमध्ये टोचल्यासारखे दुखत असेल आणि काही खाल्ल्यावर किंवा चावल्यावर वेदनांमध्ये वाढ होत असेल तर हे जंतूसंसर्गाचे किंवा दात तुटल्याचे लक्षण असू शकते. अशावेळी तातडीने दंततज्ज्ञांना भेटायला हवे. दातांच्या वेदनेचे कारण शोधून काढण्यासाठी क्ष-किरण चाचणी केली जाते. 
 
* दातांच्या आरोग्याशी संबंधित नसणार्‍या काही कारणांमुळेही दातदुखी निर्माण होऊ शकते. सायनससारख्या त्रासामुळे दात दुखू शकतात. 
 
* संवेदनशीलता हे दातांच्या वेदनेचे एक कारण असू शकते. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखे वाटत असेल तर तुमचे दात संवेदनशील झाले आहेत, असे समजावे. दातांवरचे आवरण निघून गेल्यास, विरळ झाल्यास किंवा हिरड्यांच्या समस्येमुळे दात संवेदनशील बनू शकतात. या समस्येवरचा उपाय शोधणे गरजेचे आहे. 
 
* दातदुखी असताना तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. खूप अस्वस्थ वाटत राहते. म्हणूनच कॅव्हिटी किंवा जंतूसंसर्गअसेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.
 
श्रीशा वागळे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती