शनिवार, रविवार भरपूर झोपा; आयुष्य वाढवा

झोप ही गोष्ट प्रत्येकालाच अत्यंत प्रिय असते. त्यामुळेच मग सुट्टीच्या दिवशी अगदी तासन्‌ तास अंथरुणात लोळत राहणे अनेकांची सवय असते. मात्र तुम्हाला हे माहितीय का? की, शनिवार, रविवार म्हणजेच आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी भरपूर झोपल्यामुळे आपलं आयुष्य वाढण्यास मदत होते. झोप या विषयावर संशोधन करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टीमच्या जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
अनेकदा कामाच्या धावपळीत आठवड्याभरात झोप पूर्ण होत नाही आणि त्याचाच परिणाम हा आरोग्यावर होत असतो. झोपेवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जे लोक दररोज सहा किंवा सात तास झोपतात त्यांच्या तुलनेत पाच किंवा त्यापेक्षा कमी  तास झोपणार्‍यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका हा अधिक असतो. तसेच सुट्टीच्या दिवशी जे लोक अधिक तासांची पुरेशी झोप घेतात त्यांचं आयुष्य वाढण्यास मदत होते. मात्र ज्याप्रमाणे पाच तासांपेक्षा कमी तास झोपणं जसं आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं. तसेच पुरेशा झोपेपेक्षा जास्तीची झोप घेणंही महागात पडू शकतं. स्वीडनध्ये जवळपास 40,000 लोकांचा या संशोधनासाठी अभ्यास केला गेला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती