उच्च रक्तदाब असल्यास या 5 गोष्टींचे सेवन करा

रविवार, 16 मे 2021 (09:30 IST)
हायपरटेन्शन (हाय बीपी) ही एक समस्या आहे ज्यामुळे हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते. जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा आपण त्याबद्दल विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उच्चरक्तदाब दूर करू शकणार्‍या 5 गोष्टींबद्दल जाणून घ्या-
 
1 डाळिंब- डाळिंबामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.यामुळे रक्तदाब सामान्य राहतो आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका नसतो. 
 
2 गाजर - या मध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन ए आढळतात. जे  शरीरातील द्रवपदार्थाचे संतुलन राखतात आणि रक्तदाब सामान्य राखण्यास मदत करतात.
 
3 मुळा- मुळा आपले रक्तदाब नियंत्रित करते. या मध्ये  आढळणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते.
 
4 पालक- जरआपण उच्चरक्तदाबाचे रुग्ण असाल तर पालक आपल्यासाठी फायदेशीर आहे. या मध्ये आढळणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या धमन्यांना आकुंचन होण्यापासून प्रतिबंधित करते.
 
5 मेथी- मेथी मध्ये विरघळणारे फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. याशिवाय या मध्ये आढळणारे  सोडियम रक्तदाब संतुलित ठेवते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती