तज्ञांकडून टायफॉइड आणि कोरोनामधील फरक जाणून घ्या

शुक्रवार, 14 मे 2021 (19:54 IST)
कोरोनाकाळात कोरोना विषाणूंसह टायफॉइडची रुग्ण देखील आढळून येत आहे.कोरोना विषाणू आणि टायफॉइडची लक्षणे एकत्र येऊन लोकांना गोंधळात टाकत आहेत. उन्हाळ्यात, टायफॉइडचा धोका होण्याची भीती असते.कोरोना व्हायरस आणि टायफॉइडची काही लक्षणे समान आहेत, परंतु काही वेगळी आहे. कोरोना विषाणू आणि टायफॉइड मधील फरक कसा समजून घ्यावा? कोरोना बद्दल किती जागरूकता आहे ?  
आयुष मंत्रालयातील वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ होमिओपॅथी फिजिशियन डॉ. ए.के द्विवेदी यांच्या कडून जाणून घ्या.
डॉ. ए.के द्विवेदी म्हणाले, 'टायफॉइडच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, पोटदुखी, ताप, भूक न लागणे, अशक्तपणा यांचा समावेश आहे. तसेच, कोरोनाच्या लक्षणांमध्ये सर्दी, ताप, घसा खवखवणे, शरीर वेदना, गंध नसणे, चव नसणे, अशक्तपणा यांचा समावेश आहे. दोघांमधील साम्य कमी आणि फरक जास्त आहे. तो फरक समजून घेणे आवश्यक आहे. तथापि, कोरोना असल्यास ते काय करतील या भीतीने बरेच लोक तपास करीत नाहीत.
सर्वप्रथम कोरोनाची तपासणी करून घ्या. नंतर टायफॉइडची तपासणी करा. कोरोना अहवाल  नकारात्मक आल्यावर आपण  आणि आपले कुटुंब निश्चिन्त होतील. या नंतर आपण आरामात टायफॉइड वर उपचार घेऊ शकता. 
डॉ. एके द्विवेदी म्हणतात की,कोरोना उपचार योग्य वेळी सुरू करणे आवश्यक आहे, एक निश्चित वेळअसते ज्यामध्ये योग्य उपचार आणि काळजी घेणे आवश्यक असत . व्यक्ती कोरोना तपासला भीतीपोटी जात नाही त्यामुळे कुटुंबातही हा संसर्ग पसरत आहे. तसेच रुग्णाची प्रकृती देखील अधिक खराब होते. सध्याच्या काळात शहरांसह इतर खेड्यांमध्येही समान जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. कोरोना कोणता रोग आहे हे लोकांना समजत नाही? खेड्यांमध्ये प्रचाराचे माध्यम फारच मर्यादित आहे. सोशल मिडियाद्वारे ही मोहीम चालविली जात आहे परंतु बहुतेक गोंधळात टाकणारे आहे, दुसरे म्हणजे टीव्ही आणि तिसरे वृत्तपत्र. वृत्तपत्रातून लोक जागरूक होतात पण फारसे नाही.
गेल्या वर्षी खेड्यांमध्ये जागरूकता नव्हती. त्यांना समजत नाही की कोरोना म्हणजे काय? भारत हा खेड्यांचा देश असे म्हणतात परंतु खेड्यांमध्ये प्राणघातक आजाराबद्दल फारशी माहिती नाही. म्हणून कोरोनाच्या तपासणी नंतर टायफॉइडची तपासणी करा.
आजकाल कोरोनासमवेत टायफॉइड देखील होत आहे, तर मग टायफॉइड म्हणजे काय ते जाणून घेऊया? कसे ओळखावे याची लक्षणे कोणती? काय खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 
टायफॉइड म्हणजे काय?
 
टायफॉइड पाचक प्रणाली आणि रक्तप्रवाहात संक्रमणामुळे होतो. टायफॉइड मध्ये, साल्मोनेला टायफी नावाचा एक बॅक्टेरिया  शरीरात प्रवेश करतो. सर्वप्रथम ते दूषित पाणी आणि अन्नाद्वारे प्रवेश करतो. हे पाचन तंत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो.
 
* टायफॉइडची लक्षणे-
 
* थंडी लागून ताप येतो.
 
*संसर्गामुळे भूक न लागणे.
 
* अंगदुखी.
 
* शरीरावर लाल पुरळ येणं.
 
* आळस येणे.
 
- टायफाइडमध्ये, रुग्णाचा  तापाचा तपमान 102 ते 105 अंशांपर्यंत असतो.
 
टायफॉइड झाल्यास खबरदारी घ्या.
 
*  स्वच्छतेची काळजी घ्या.
 
*  कोमट पाणी प्या.
 
*  इतरांपासून अंतर ठेवा.
 
* कच्चे अन्न खाऊ नका, शिजविलेले अन्न खावे.
 
* स्वतंत्र खोली मध्ये रहा. जेणे करून संक्रमण पसरू नये.
 
*  भरपूर तरल द्रव प्या.
 
* आपले शरीर ओल्या कपड्याने पुसून घ्या. स्नान करू नका.
 
* ताप येत असेल  तर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा.
 
टाइफाइडवर उपचार कसे शक्य आहेत?
 
टायफॉइडचा उपचार अँटीबायोटिक औषधाने शक्य आहे.  योग्य वेळी उपचार घेतल्यावरआठवड्यात एखाद्याला आराम मिळतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. टायफाइड सुमारे 15 दिवस टिकतो. म्हणून, खबरदारी घेतल्याने लवकरच बरे होऊ शकतो.
 
आपण टायफाइडमध्ये घरगुती उपचार देखील वापरू शकता -
 
1 गिलोय पाणी  - गिलोय रात्रभर चार कप पाणी घालून भिजवा. सकाळी पाणी उकळवा म्हणजे एक कप पाणी राहील . ते पाणी अर्धा-अर्धा कप सकाळी संध्याकाळी प्या.
 
2 लसूण - लसूणची प्रकृती उष्ण आहे परंतुअँटी बायोटिक  आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असते . लसूण  तूपात भाजून घ्या आणि सेंधव  मीठ घाला आणि पाण्यासह एका लसणाची पाकळी द्या.
 
3. तुलसी आणि सूर्यमुखी - दोघांचा रस काढून प्यावे. तसेच एका भांड्यात तुळशीची पाने घाला आणि चांगली उकळवा आणि दिवसातून 3-4 वेळा प्या.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती