सध्या कोविड ने संपूर्ण जग हैराण झाले आहे. या संसर्गाला लढा देण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे. जर एखाद्याची प्रतिकारशक्ती, किंवा रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता कमकुवत असेल तर हा विषाणू त्या लोकांना वेढतो. यासाठी स्वतःकडे लक्ष देणे आणि खाण्या-पिण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. चला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी दररोजची जीवनशैली, शारीरिक क्रियाकलाप आणि खाण्या-पिण्याची काळजी घेण आवश्यक आहे. आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामध्ये अँटिव्हायरल गुणधर्म आहे. जेणे करून आपली प्रतिकारक शक्ती बळकट राहील आणि आपला शरीर सर्व प्रकाराच्या आजारांपासून वाचून राहील.
अँटिव्हायरल आणि अँटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असलेल्या गोष्टींचे सेवन करा. या साठी आपण दररोज तुळशीचे सेवन करू शकता. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करेल. तुळशीची 5 पाने दररोज 1 चमचा मध आणि 3-4 काळी मिरी घालून खा, हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.