ओमिक्रॉनच्या या पाच सामान्य लक्षणांबद्दल जाणून घेऊ या

शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:56 IST)
कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनबद्दल जगभरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे, कारण या प्रकाराची लक्षणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत. आतापर्यंतची प्रकरणे पाहता, तज्ञांनी ओमिक्रॉनची काही लक्षणे दिली आहेत.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 थकवा -पूर्वीच्या व्हेरियंटप्रमाणे, ओमिक्रॉनमुळे थकवा किंवा जास्त थकवा येऊ शकतो. ओमिक्रॉनच्या रुग्णाला नेहमी थकल्यासारखे वाटते. जरी तो कठोर परिश्रम करत नसला तरी त्याला थकवा जाणवतो आणि नेहमी विश्रांती घेऊ इच्छितो. जर आपल्याला ही विनाकारण थकवा जाणवू लागला असेल तर एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
 
2 घशात ओरखडे आल्या सारखे जाणवणे-  घशात ओरखडे आल्यासारखे वाटते  , ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तींनी घसा खवखवण्याऐवजी "स्क्रॅच" करण्याची तक्रार केली, जी एक असामान्य गोष्ट आहे. अशा स्थितीत असे म्हणता येईल की घसा खवखवणे इतका वाढतो की घशात जखमा झाल्यासारखे वाटू लागते. यामुळे घशातील वेदनाही वाढते. 
 
3 सौम्य ताप -हा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यापासून सौम्य ते मध्यम ताप हे कोविड 19 च्या नोंदवलेल्या लक्षणांपैकी एक आहे, परंतु ओमिक्रॉनमध्ये ताप सौम्य असतो आणि तो अनेक दिवस राहतो. उच्च तापाची प्रकरणे क्वचितच आढळतात. ओमिक्रॉनमध्ये, शरीराचे तापमान अनेक दिवस सतत वाढत असतात. 
 
4 रात्री घाम येणे आणि अंग दुखणे -ओमिक्रॉन बाधित रूग्णांमध्ये आतापर्यंत आढळून आलेल्या लक्षणांचे वर्णन केले. रात्री घाम येणे हे देखील या आजाराचे लक्षण असल्याचे ते सांगतात. सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या आजाराने त्रस्त असलेला माणूस एसी चालवून किंवा थंड जागी झोपला तरी त्याला घाम येतो. 
 
5 कोरडा खोकला -ओमिक्रॉनचा त्रास असलेल्या लोकांना कोरडा खोकला  देखील होऊ शकतो. कोविड 19 च्या लक्षणांमध्येही हे लक्षण दिसून आले. जेव्हा घसा कोरडा होतो किंवा एखाद्या संसर्गामुळे घशात काहीतरी अडकले असे जाणवल्यास   कोरडा खोकला येतो. वाढत्या कोरड्या खोकल्यामुळे घशात दुखणे वाढते आणि काहीही खाणे-पिणे त्रासदायक होते. 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती