कर्करोगाने वेढलेल्या रुग्णाला केमोथेरॅपी घेण्याचा सल्ला दिला जातो केमोथेरेपीने सामान्य आणि कर्करोगाच्या पेशी मरण पावतात, काय आहे केमोथेरॅपी चला जाणून घेऊ या आणि शरीरासाठी किती फायदेशीर आहे शरीरावर त्याचा दुष्परिणाम काय होतो जाणून घेऊ या.
* केमोथेरॅपी काय आहे आणि कशी करावी -
कर्करोगाच्या पेशी जास्त प्रमाणात असतील तर ते पेशी कमी करण्यासाठी केमोथेरॅपी द्यावी लागते,केमोथेरॅपी देताना काही गोष्टींची काळजी घ्यावयाची असते. जेणे करून रुग्णाचा आजार कमी होईल आणि त्याला कोणत्याही प्रकाराची अस्वस्थता जाणवू नये.शरीरातील कर्करोगाचे प्रकार, त्याचे प्रमाण वजन वय, इतर आजारांना बघून केमोथेरॅपी देण्याची गरज असते, जे नेहमी कॉम्बिनेशन करून दिले जाते, जे रुग्णाच्या कर्करोगाच्या प्रकाराच्या आधारे दिले जाते.केमोथेरॅपी नेहमी प्रशिक्षित डॉक्टरांच्या देखरेखी खाली दिले जाते.
* केमोथेरॅपीचे दुष्प्रभाव -
केमोथेरॅपी मध्ये कर्करोगाच्या पेशींसह रोग प्रतिकारक शक्ती आणि सामान्य पेशी देखील मरतात, ज्यामुळे कर्करोग कमी होतो, रोग प्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. या मुळे वारंवार संक्रमण होणं, अशक्तपणा जाणवणे,वजन कमी होणं,हाडे कमकुवत होणं,केसांची गळती, किडनी आणि लिव्हर कमकुवत होणं, महिलांमध्ये ओव्हरी खराब होणं, पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होणं इत्यादी समस्या उद्भवतात. केमोथेरॅपी चे डोस कधीही जास्त दिले जात नाही. तज्ज्ञ डॉक्टर रोगाचा प्रादुर्भावाला बघता औषध देतात. कर्करोगाच्या पेशी जास्त प्रमाणात असतील तर ते पेशी कमी करण्यासाठी केमोथेरॅपी द्यावी लागते, अशा परिस्थितीत बरं होण्याची शक्यता कमी असते.
* योग्य उपचार-
सध्या जागतिक पातळीवर इम्युनो थेरेपीवर अधिक जोर दिला जातो आणि अँटीबॉडीज वर लक्ष दिले जाते, जेणे करून कर्क रोगांच्या पेशींना लक्ष बनवून त्यांचा नायनाट करून रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आणि जीवनशैली बदलून कर्करोगावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविता येऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यावर कर्करोग असल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. वास्तविक कर्करोगाचा उपचार स्वस्त नाही.रेडियोथेरेपी आणि शल्यचिकित्सा देखील स्वस्त नाही. नवीन थेरेपीची तुलना करा तर 10 ते 15 टक्के खर्च ह्याचे देखील आहे.परंतु ह्याचा फायदा रुग्णाला जास्त होतो. सध्या कर्करोगाला आजार म्हणत नसून लाइफस्टाइल किंवा जीवनशैली असे नाव दिले जात आहे, कारण या आजाराचे प्रमाण चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि तणावामुळे जास्त आढळून येत आहे. जे लोकं रात्र भर काम करतात आर्सेनिक युक्त जेवण करतात.तणावात राहतात या लोकांना हा कर्क रोग होण्याची शक्यता जास्त असते.
* तणाव दूर ठेवा.
* आहारात सुकेमेवे, फळ आणि भाज्या समाविष्ट करा.
* योग आणि ध्यान वर अधिक लक्ष द्या.