Hypertension काय आहे त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घ्या

सोमवार, 17 मे 2021 (09:10 IST)
हायपरटेंशन म्हणजे उच्च रक्तदाब याचे मुख्य कारण म्हणजे ताण घेणं आणि अनियंत्रित खाणे. हे कोणा व्यक्तींसह देखील होऊ शकत. परंतु हे घरापासून लांब राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त आढळतं.
 
हायपरटेंशन ला उच्च रक्तदाब आणि उच्च बीपीचा त्रास असे म्हणतात.  ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो. या दबाबाच्या वृद्धीमुळे रक्तवाहिन्यांपर्यंत रक्त प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी हृदयाला अधिक कार्य करण्याची आवश्यकता असते.
आरोग्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रक्तदाब 130/80 mmHg पेक्षा जास्त असल्यास व्यक्ती हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाच्या श्रेणीत येतो. उच्च रक्तदाब कोणत्याही वेळी शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो, परंतु यामुळे हृदयाचे सर्वात अधिक  नुकसान होते. चला, उच्च रक्तदाबाची काही मुख्य कारणे जाणून घेऊ या.  
 
उच्च रक्तदाब कारणे
 
* झोपेचा अभाव होणं 
* लठ्ठपणा
* जास्त प्रमाणात राग करणे 
* नॉन-वेजचे जास्त प्रमाणात सेवन करणे 
* तेलकट पदार्थ आणि अनारोग्य आहाराचे सेवन करणे 
 
चला आता हायपरटेन्शनची काही साधी लक्षणे जाणून घ्या -
 
1 हायपरटेंशन आणि उच्च रक्तदाब असल्याचा स्थितीत व्यक्तीला सुरुवातीस डोक्याच्या मागील बाजूस आणि मानेत वेदना होऊ शकते. 
 
2 उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.
 
3 रक्तदाब वाढल्यावर व्यक्तीला अंधुक दिसण्यासह लघवी वाटे रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते.
 
4 उच्च रक्तदाब झाल्यावर चक्कर येणे ,थकवा,आणि सुस्तपणा सारख्या लक्षणांची तक्रार होऊ शकते. 
 
5 बऱ्याच वेळा रात्री झोप न येण्यासह हृदयाचे ठोके वाढण्याची समस्या उद्भवते.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती