उदबत्तीचा धूर सिगारेटपेक्षाही धोकादायक

सकाळ-संध्याकाळ देवापुढे दिवा आणि उदबत्ती लावल्यानंतर घरातील प्रसन्न वातावरण सर्वांनाच आवडते. पण उदबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षाही धोकादायक असतो, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. 
 
साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि चायना टोबॅको म्वांगडंग इंडस रेल कंपनीने संयुक्तपणे केलेल्या सिगारेट व उदबत्तीच्या धुराच्या परिणामांच्या तुलनात्मक अभ्यासातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. उदबत्ती व धूप जाळ्याने निघणार्‍या धुरात सिगारेटपेक्षाही घातक घटक असतात. या घटकांमुळे माणसाच्या डीएनएमध्येही बदल होऊ शकतात.
 
उदबत्ती व धूपाच्या धञरात 99 टक्के अतिसूक्ष्मकण असतात. हे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन हवेत मिसळतात आणि श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन तिथेच अडकतात. फुफ्फुसांवर याचा वाईट परिणाम होतो. शरीरातील जिवंत पेशींना हे कण धोका पोहोचवतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सिगारेटच्या धुराच्या तुलनेत खूपच अधिक असते, असा अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती