अंड्याच्या पिवळ्या भागाने घटतो कर्करोगाचा धोका

स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात अंड खाणे हा उपाय लाभदायक ठरु शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. मात्र, अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलेस्टेरॉल अधिक असल्याने अनेकजण केवळ पांढरा भाग खाणे पसंत करतात, परंतू योग्य प्रमाणात अंड्याचा आहारात समावेश केल्यास ते आरोग्यदायी ठरते.
 
अंड्यामध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळते. हे एका प्रकाराचे पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आहे. त्याचा होणारा परिणाम ठाम आणि नेमका अजूनही समजला नसला तरीही ओमेगा 6 फॅटी अॅसिड स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरते. तसेच अंड्यामध्ये बी कॉम्प्लॅक्स, वेगवेगळी जीवन सत्वे आढळतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती