शिंक रोखण्याचा प्रयत्न ठरु शकतो घातक

सार्व‍जनिक ठिकाणी वावरताना बर्‍याच वेळा खोकला, शिंक किंवा उचकी आल्याने आपल्याला ऑकवर्ड वाटते. त्यामुळे आपण शिंक रोखण्याचा प्रयत्न करतो पण त्या गोष्टी शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्यामुळे शिंक न रोखण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात.
 
शिंक रोखल्याने एका तरुणाने आवाज गमावल्याची घटना घडली आहे. शिंक रोखण्यासाठी त्याने आपले तोंड व नाक बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या घशाला सूज आली व त्याचा घसा दुखू लागला व थोड्याच वेळात आपण आवाज गमावल्याचे समजले. ब्रिटेनच्या लीसेस्टर यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली पण त्याने आवाज मात्र कयमचा गमावला.
 
शिंक रोखल्यास मेंदूला होणारा रक्तप्रवाह विस्कळीत होऊ शकतो आणि आपल्या रक्तवाहिन्या आणि मज्जातूंतू ही संकुचित होतात. यामुळे डोकेदुखी, रक्तवाहिन्या डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे कधीही स्वत:ला शिंकण्यापासून थांबवू नका. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस हेल्थ सायन्स सेंटरचे मुख्य आणि सर्जन डॉ. जी यांग म्हणतात की शिंक रोखल्याने तुमच्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते. तुम्हाला सतत शिंका येत असतील अनू तुम्ही त्या रोखत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या फुक्फुसांवर होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती