काही लोक कंटाळा अथवा आळस घालवण्यासाठीही या दोन पेयांचा सर्रास वापर करतात. मात्र, अनेक संशोधनांत कॉफी पिणे हे शरीरासाठी नुकसानकारक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर काहींत ही दोन्ही पेये शरीरासाठी लाभकारक असल्याचा दावा करण्यात आला.
यासंबंधी आता एक नवे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणे आवश्यक ठरते. कारण चहाच्या तुलनेत कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॉफी शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच आळस घालवण्याचे काम करत असली तरी प्रमाणापेक्षा जास्त कॅफिनमुळे घाबरणे अथवा हृदयासंबंधीची समस्याही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कॅफिनयुक्त पेय घेण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिल्यास कॅफिनचे जळजळणे, अल्सर, पोटाचा कॅन्सर या सारख्या आजरांचा धोका वाढतो.