ड्रग कंट्रोलरने म्हंटले कि, रेनिटिडाइनमध्ये अनेक प्रकारचे केमिकल आढळून आले असून त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. रेनिटिडाइनचा वापर केवळ अॅसिडिटीसाठीच नव्हेतर आतड्यांमध्ये होणार अल्सर, गैस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स बीमार, इसोफैगिटिस यासाठीही करण्यात येतो. हे औषध मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारात आणि इंजेक्शनमध्ये उपलब्ध आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, आरोग्य सेवा महासंचालनालयाचे व्हीजी सोमाणी यांनी देशभरात रेनिटिडाइनवरून चेतावणी जारी केली आहे. आणि राज्यांना याविरोधात तातडीने पावले उचलण्यास सांगितले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या एफडीएने रेनिटिडाइनमुळे कॅन्सर होण्याचा धोका असल्याचा सर्वप्रथम दावा केला होता. आणि याविषयी अलर्टही जारी केला होता. भारतात या औषधाचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना त्वरित उत्पादन घेण्यास बंदी केली आहे. तसेच डॉक्टारांनाही रेनिटिडाइन औषध रुग्णांना देण्यास मनाई केली आहे.
भारतातील औषधांची गुणवत्ता, सुरक्षा यावर नियंत्रण ठेवणारी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने रेनिटिडाइनशी संबंधित रिपोर्ट विषय तज्ञ समितीकडे पाठविला आहे. ही समिती देशभरात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या नावाने विकल्या जाणाऱ्या रेनिटिडाइन औषधाची चौकशी करेल.