काय सांगता, 3 लेयरचा मास्क किंवा एन -95 मास्क अधिक सुरक्षित आहे

मंगळवार, 9 मार्च 2021 (09:10 IST)
एका संशोधनात आढळून आले आहे की अनेक थर असलेले मास्क एका व्यक्तीला हवेमध्ये किंवा गॅस मध्ये विरघळलेल्या सूक्ष्म घन कण किंवा द्रव्याच्या थेंबा(एअरोसॉल)च्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी सर्वात जास्त प्रभावी आहे. बेंगलुरूमधील भारतीय विज्ञान संस्था( आयआयएससी)च्या संशोधकाच्या नेतृत्वात एका पथकाने हा अभ्यास केला आहे.    
 
आयआयएससीच्या म्हणण्यानुसार,जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोकला येतो तेव्हा त्याच्या तोंडातून किंवा नाकातून निघालेले द्रव्य (200 मायक्रॉन पेक्षा जास्त) द्रुतगतीने मास्कच्या आतील थराला धडकतात आणि मास्क मध्ये शिरतात. या थेंबा पुढे जाऊन लहान लहान थेंबांमध्ये तुटतात आणि हवेमध्ये किंवा गॅसमध्ये विरघळण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे त्यांच्या मध्ये सोर्स-सीईओव्ही -2 सारखे व्हायरस असू शकतात.  
 
संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,संघाने उच्च दर्जेच्या कैमऱ्याच्या द्वारे 1 थर,2 थर आणि इतर अनेक थरांच्या मास्कवर खोकला असताना निघालेल्या द्रव्य कणांच्या मास्क शी धडकणे आणि नंतर कपड्यांध्ये प्रवेश करतानाचा अभ्यास केला. 
 
या अभ्यासात असे म्हटले आहे की या 1 थराच्या आणि 2 थराच्या मास्कमध्ये या लहान थेंबाचे आकार 100 मायक्रॉन पेक्षा कमी असल्याचे आढळले आणि अशा प्रकारे यामध्ये ' एरोसोल ' बनण्याची शक्यता होती, जी जास्त काळ हवेच्या संपर्कात राहून संसर्ग पसरवू शकत होती. 
 
यांत्रिकी विभागातील प्राध्यापक सप्तर्षी बसू म्हणाले की आपण जरी सुरक्षित आहात परंतु आपल्या सभोवतालीचे लोक सुरक्षित नाही. अभ्यासात असे म्हटले आहे की कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 3 थरांचे मास्क किंवा एन-95 मास्कचा वापर करावा. हे सर्वात जास्त सुरक्षित आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती