Acidity Or Heart Attack अॅसिडिटी (Acidity) होणं म्हणजे पित्त हा आजार तसा सामान्य आहे. दैनंदिन जीवनात चुकीचा आहार घेतल्यानं, अनियमित व्यायाम किंवा अपुरी झोप आदी कारणांमुळे पित्त किंवा अॅसिडिटीचा त्रास होतो.भूक नसताना जेवणे, मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन, चहा किंवा कॉफीचे अतिसेवन आणि रात्री उशीरा जेवणे तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे अशा वाईट सवयी ॲसिडिटीस कारणीभूत ठरतात. काही औषधांमुळे छातीत जळजळ होते जसे की ॲंटीबायोटिक्स, आयन इत्यादी.