लठ्ठपणामुळे कमी होतो स्मृतिभ्रंशाचा धोका

गुरूवार, 16 एप्रिल 2015 (09:19 IST)
गंभीर आजार जडण्याचा इशारा जास्त वजनामुळे दिला जात असला तरी लठ्ठपणाचा फायदाही समोर आला आहे. डिमेन्शियाचा (स्मृतिभ्रंश) धोका जास्त वजनामुळे कमी होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधनातील तथ्य वैद्यकीय सल्ल्यापेक्षा भिन्न मिळाल्याने संशोधकही चकित झाले आहेत.
 
साधारण 20 लाख ब्रिटिश लोकांच्या आरोग्याचे विलेषण लान्सेट डायबिटीस अँण्ड अँण्डोक्राननोलॉजीच्या संशोधनात करण्यात आले. यामध्ये कमी वजन असणार्‍यांना डिमेन्शियाचा धोका सर्वात जास्त असल्याचे दिसून आले. डिमेन्शियावर काम करणार्‍या संस्था अद्यापही धूम्रपान न करणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. आधुनिक आरोग्याशी संबंधित मुद्दय़ांमध्ये डिमेन्शिया महत्त्वपूर्ण समस्या आहे. 2050 पर्यंत या रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ होऊन 13.5 कोटी होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर कोणताच इलाज नाही. निरोगी आरोग्याची जीवनशैली अंगिकारणे हाच त्यापासून बचाव करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला आहे. मात्र ते चुकीचेही असू शकते.
 
संशोधन पथकाचे प्रमुख डॉ. नवाब क्विजिलबाश यांनी हे आश्चर्यकारक निष्कर्ष असल्याचे सांगितले. सामान्य आणि निरोगी बॉडी मास इंडेक्स असणार्‍या लोकांच्या तुलनेत अधिक वजन आणि लठ्ठपणाने त्रस्त लोकांमध्ये डिमेन्शियाचा धोका कमी असतो. 
 
हे निष्कर्ष मागील अनेक अभ्यासांपेक्षा भिन्न आहेत. तुम्ही एकाच वेळी सर्व अभ्यास एकत्र केल्यास योग्य निष्कर्षाच्या प्रकरणांत आमचा अभ्यास या सर्वाना मात देईल, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा