चालण्यासारखा स्वस्त व मस्त व्यायाम दुसरा नाही!

वेबदुनिया

शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2011 (13:33 IST)
ND
फिटनेससाठी काय करायचं हा प्रश्न नेहमी महिलांना पडतो. अनेक जणींना आर्थिक आणि वेळेच्या सीमांमुळे जिमला जाणं शक्य नसतं. जिमला जाणो जमत नसेल तर घरगुती व्यायामांनी तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

सकाळी अर्धा तास फक्त चाला. चालण्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही. स्वस्त आणि मस्त असा हा व्यायाम आहे. कितीही काम असले तरी दिवसातला अर्धा ते एक तास स्वत:ला दिलाच पाहिजे. चार महिने तरी सलग हा व्यायाम तुम्ही कराच!

ND
चार महिन्यांनंतर काय?

1) हळूहळू प्राणायाम, हलकी योगासने तुम्ही करू शकता.

2) वॉशिंग मशीनमध्ये कपडे न धुता स्वत: घासून कपडे धुवा. खाली वाकून फरशी पुसा, जमलं तर केर काढा. अगदी रोज नाही तरी एक दिवसाआड तरी करा, यामुळेही चांगला व्यायाम होऊ शकतो.

3) अर्धी बादली पाण्याने भरून एका हातात उचलण्याने खांद्यांचा चांगला व्यायाम होऊ शकतो.

4) हात खुर्चीवर ठेवून खाली-वर केल्यानेही शरीरावर ताण पडतो.

5) इमारत असेल तर लिफ्ट ऐवजी जिन्यावरून चढ उतर करा, परिसरात हिरवळ असतील, झाडे असतील तर त्या भागात व्यायाम करा ज्यामुळे झाडातला ऑक्सिजन मिळू शकतो.

नियमित व्यायाम, सुयोग्य आहार, फळे, भाज्या, पाणी यांचा आहारात समावेश आणि वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी यामुळे तुम्ही सुडौल शरीर सहज कमवू शकता.

वेबदुनिया वर वाचा