तामिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एका महिलेने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. कारण होते की, सोशल मीडियावर लोक या महिलेला बेजवाबदार आई म्हणून ट्रोल करीत होते. सतत होणाऱ्या या ट्रोलिंगमुळे ही महिला डिप्रेशन मध्ये गेली. व टोकाचे पाऊल उचलले.
काही दिवसांपूर्वी चेन्नई मधील एक व्हिडीओ वायरल झाला होता. यामध्ये दिसले होते की, एक लहान बाळ फ्लॅटच्या गॅलरीमधून खाली फ्लॅटच्या शेडवर पडले. ही घटना तेव्हा घडली होती. जेव्हा आई बाळा कुशीमध्ये घेऊन दूध पाजवत होती. नंतर आजूबाजूच्या लोकांनी मोठ्या शर्तीने या बाळाला वाचवले होते. या घटनेनंतर महिला खूप तणावात होती.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेचा व्हिडीओ वायरल झाल्यामुळे यानंतर लोकांनी या बाळाच्या आईला ट्रॉल करण्यास सुरवात केली. सतत होणाऱ्या या ट्रोलिंगमुळे ही महिला डिप्रेशनमध्ये गेली. व सतत होणाऱ्या या ट्रोलिंगमुळे आणि तिरस्कारामुळे या महिलेने स्वतःला संपविले. या महिलेला दोन लहान मुले आहेत. ज्यामधील एकाचे वय पाच वर्षे आहे आणि दुसऱ्याचे 8 महिने आहे