आपले मेंदू तीक्ष्ण कसे कराल, सोपे उपाय अवलंबवा

गुरूवार, 11 मार्च 2021 (09:50 IST)
या प्रतिस्पर्धेच्या युगात प्रत्येक जण एकमेकांपासून पुढे वाढू इच्छुक आहे. पुढे वाढण्यासाठी मेंदूदेखील तीक्ष्ण असावे लागते. आपली बुद्धी तीक्ष्ण असेल तर आपण कोणत्याही कठीण परिस्थितीतून सहजपणे मार्ग काढू शकाल. आपल्या बुद्धीला अधिक तीक्ष्ण कसे करता येईल .
एक चांगली बुद्धिमत्ता मेंदूच्या आरोग्यावर आणि चैतन्यतेवर अवलंबून असते.आपण शिकणारे विद्यार्थी असाल किंवा ऑफिसात काम करणारे असाल आपल्या मेंदूला तीक्ष्ण बनविण्यासाठी मानसिक दृष्टया निरोगी राहणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या साठी आपण काही उपाय अवलंबवावे. जेणे करून आपले मेंदू अधिक तीक्ष्ण होईल.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 योग्य आणि सकस आहार घ्या-
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अन्नाची भूमिका योग्य असते.कारण निरोगी  शरीरात नेहमी निरोगी मेंदू असतो. म्हणून नेहमी योग्य आणि निरोगी सकस आहार घ्यावा. जेणे करून आपले शरीर आणि मेंदू दोन्ही निरोगी राहतील.
*हिरव्या पालेभाज्या नियमितपणे सेवन करावे, हे मेंदूला तीक्ष्ण करण्यात मदत करतात.
* दररोज नियमितपणे बदाम खा, बदाम स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
* ब्रोकोली चे सेवन करा.
* डार्क चॉकलेट चे सेवन करा.हे मेंदूच्या शक्तीला वाढवते.
* दररोज अंडी खा, या मध्ये व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात आढळते.मेंदूला तीक्ष्ण करते.
* जास्त तिखट आणि गरिष्ठ अन्न खाऊ नका.
* धूम्रपान करू नका.
* जंक फूड अत्याधिक प्रमाणात घेऊ नका.
* अल्कोहोलचे सेवन करू नका.  
 
2 मानसिक व्यायाम करा-
मनाला गती देणारे व्यायाम करा कोडे सोडवा,अशा प्रकारचे व्यायाम केल्याने मेंदूला चालना मिळेल आणि मेंदू तीक्ष्ण होईल.
 
3 सात ते आठ तास झोपा-
मेंदूला ताजे करण्यासाठी मेंदूला विश्रांती देण्याची गरज आहे. पुरेशी झोप आपल्या तणावाला कमी करते.माणसाला किमान सात ते आठ तासांची झोप घ्यायलाच पाहिजे.
 
4 योग आणि ध्यान- 
योगा आणि ध्यान हे मेंदूला स्थिर करून तणाव कमी करतो. या मुळे मेंदूला आराम मिळतो. एकाग्रता वाढते.योगा केल्याने मेंदूत रक्त प्रवाह चांगला होतो.स्मरणशक्ती वाढते.
 
5 काही काळासाठी गाणे ऐका-
आवडीचे गाणे ऐकल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. काही करावयास वाटत नाही किंवा ताण असेल तर आपल्या आवडीचे गाणे ऐकून आपण मेंदूला ताजे तवाने करू शकता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती