मसाल्यामध्ये हळदीचे आपले महत्त्व आहे. स्वाद वाढवण्यासाठी तसेच आरोग्यासाठी लाभप्रद हळदीला धार्मिक कार्यांमध्ये देखील अत्यंत महत्त्व आहे. हळद विशेष प्रकाराची औषधी आहे ज्यात दैवीय गुण आढळतात. लग्नात वर-वधूला हळद लावण्यामागे देखील हेच कारण आहे की त्यांना बाह्य बाधांपासून, नजरेपासून वाचवता यावे. सोबतच आरोग्य जपण्यात आणि सुंदरता वाढवण्यातही हळद मदत करते. आता जाणून घ्या आणखी काय महत्त्व आहे ते:
हळदीचा संबंध बृहस्पती ग्रहाशी आहे.
म्हणून पूजेत मनगटांवर किंवा मानेवर हळदी लावल्याने बृहस्पती मजबूत होत असून वाणी मजबुती येते.
* पूजेनंतर कपाळावर हळदीने तिलक केल्याने विवाह संबंधी कार्यात यश मिळतं.
* दर गुरुवारी गणपतीला एक चिमूटभर हळद चढवल्याने विवाह संबंधी अडथळे दूर होतात.
* भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीमागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने शीघ्र विवाहाचे योग बनतात.
* सूर्याला अर्घ्य देत असलेल्या पाण्यात हळद मिसळल्याने कन्याचे लग्न इच्छित वर सोबत होण्याची शक्यता वाढते.
* अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता येते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा प्रयोग उत्तम आहे
* हळद दान करणे देखील शुभ मानले गेले आहे. याने आरोग्यसंबंधी समस्या दूर होतात आणि गुरु ग्रहात अनुकूलता येते.
* हळदीची गाठ म्हणजे अख्खी हळकुंडावर लाल दोरा गुंडाळून डोक्याशी ठेवल्याने रात्री वाईट स्वप्न येत नाही. तसेच बाह्य नकारात्मक शक्ती हावी होऊ पात नाही.
* तसेच घराच्या बाउंड्रीवर हळदीची रेषा ओढल्यास घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही.
* हळदीमुळे जीवनात संपन्नता येते. नकारात्मकता दूर होते म्हणून हवनामध्ये हळदी वापरली जाते.
* हळदीच्या माळाने कोणत्याही मंत्राचा जप केल्याने आपण विलक्षण बुद्धीचे स्वामी बनू शकता.