21 ऑगस्टला लागेल पूर्ण सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची वेळ

वर्षाचा दुसरा सूर्यग्रहण 21 ऑगस्टला लागणार आहे. असे म्हटले जाते की हे पूर्ण सूर्यग्रहण असेल जे युरोप, उत्तर व पूर्व आशिया, उत्तर व पश्चिम आफ्रिका, उत्तरी अमेरिकेत पश्चिम, दक्षिण अमेरिका, प्रशांत, अटलांटिक, आर्क्टिकच्या भागांमध्ये दिसणार आहे. जेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडेल तेव्हा सूर्यग्रहण होईल. असे म्हटले जाते की 99 वर्षांनंतर अमेरिकी महाद्वीपात पूर्ण सूर्यग्रहण होईल. 21 ऑगस्टला सकाळी 10.15 मिनिटाने सूर्यग्रहण बघायला मिळेल आणि दुपारी 2.50 ला ते संपेल. तसं तर भारतात हे ग्रहण दिसणार नाही आहे.  
 
मान्यतेनुसार सूर्यग्रहणानंतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करून देवाची आराधना केली पाहिजे. अंघोळीनंतर ब्राह्मणांना आणि गरिबांना दान देण्याची परंपरा आहे. असे केल्याने ग्रहणाचा प्रभाव कमी होतो.  
 
असे म्हटले जाते की सूर्यग्रहण सुरू होण्याच्या चार प्रहर आधी भोजन नाही केले पाहिजे. तसेच ग्रहणाच्या दिवशी पान, लाकूड आणि फूल नाही तोडायला पाहिजे.  
 
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या दरम्यान कुठलेही शुभ कार्य नाही करायला पाहिजे. या दरम्यान सुरू केलेल्या कामांचे चांगले परिणाम मिळत नाही.  
 
तसेच असे ही म्हटले जाते की गर्भवती स्त्रीला सूर्यग्रहण नाही बघायला पाहिजे कारण याचा दुष्प्रभाव   शिशूवर पडतो.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती