दुपारी मंदिरात का जाऊ नये? माहित नसेल तर नक्की वाचा
सोमवार, 13 मे 2024 (17:57 IST)
हिंदू धर्मात मंदिरे केवळ देवाच्या उपासनेचे केंद्र नाहीत तर लोक आध्यात्मिक उन्नतीसाठी मंदिरांना भेट देतात. वेगवेगळ्या मंदिरांना भेट देण्याचे काही नियम आहेत, जसे काही मंदिरांमध्ये रात्री जाता येत नाही, तर काही मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास मनाई आहे तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना जाण्यास मनाई आहे. काही मंदिरात सोबत चामड्याच्या वस्तू घेऊन जाता येत नाही तर काही मंदिरांमध्ये पारंपरिक परिधानातच प्रवेश मिळतो. यासोबतच दुपारच्या वेळी मंदिरात जाणे देखील अशुभ मानले गेले आहे. पण यामागे काय कारण आहे, जाणून घेऊया याविषयी धार्मिक ग्रंथांमध्ये काय लिहिले आहे.
दुपारी मंदिरात का जाऊ नये?
धार्मिक ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की देव दुपारच्या वेळी विश्रांती घेतात, त्यामुळे या वेळी भक्तांनी मंदिरात जाऊ नये. यावेळी मागितलेल्या इच्छा देवापर्यंत पोहोचत नाहीत. यामुळेच हिंदू धर्मातील प्रसिद्ध मंदिरांचे दरवाजे दुपारच्या वेळी बंद केले जातात, जेणेकरून विश्रांती घेणाऱ्या देवी-देवतांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये.
दुपारच्या वेळी मंदिरात न जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे या काळात आपल्या शरीरात आळस भरलेला असतो. आपण सकाळ-संध्याकाळ जेवढे उत्साही असतो, तेवढा उत्साह दुपारी जाणवत नसतो. अशा परिस्थितीत दुपारी मंदिरात प्रवेश केला तर पूजा करावीशी वाटत नाही, त्यामुळे दुपारी मंदिरात जाणे योग्य मानले जात नाही.
असे मानले जाते की दुपारच्या वेळी भूत आणि अतृप्त आत्मा सक्रिय राहतात. हे असंतुष्ट आत्मे दुपारच्या वेळी मंदिरांभोवती फिरत असतात जेणेकरून त्यांना मोक्षाचा मार्ग मिळेल. त्यामुळे दिवसा मंदिरात जाणे योग्य मानले जात नाही.
त्याच वेळी जेव्हा तुम्ही सकाळ-संध्याकाळ उर्जेने भरलेले असता, तेव्हा तुम्हाला पूजा करावीशी वाटते. या काळात देव देखील जागृत अवस्थेत असतात आणि तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत सहज पोहचते. त्यामुळे हिंदू धर्मात मंदिरात जाण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते.
दुपारी घरच्या मंदिरात पूजा करावी का?
शास्त्रानुसार दुपारच्या वेळी घरातील मंदिरातही पूजा करू नये. या काळात पूजा केल्याने देवाची झोप भंग पावते. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत कुठेही पूजा करू नये, मग ते मंदिर असो किंवा घरातील प्रार्थनास्थळ. या काळात तुम्ही एकटे बसून मंत्रोच्चार करू शकता किंवा देवाचे ध्यान करू शकता. असे करणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होते. मंत्रांचा जप आणि ध्यान केल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती होते आणि तुमच्या शरीरात ऊर्जा वाढते.
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयाच्या तज्ञांचा सल्ला घ्या.