Mars Transits in Gemini: 10 ऑगस्टपासून मंगळ वृषभ राशीत भ्रमण करत होता, पण आता रविवार, 16 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12:04 वाजता वृषभ राशीतून मिथुन राशीत गोचर सुरू झाले आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहील. चला जाणून घेऊया जेव्हा मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा कोणत्या 5 राशींना जास्त फायदा होईल.
मेष राशी | Aries: मंगळ तुमच्या राशीच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करेल. कामाच्या ठिकाणी वाद टाळावे लागतील. मात्र, नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यापार्यांना नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हे गोचर शुभ आहे. भाऊ-बहिणींसोबत संबंध चांगले ठेवा. आरोग्याचीही काळजी घ्या.
मकर राशी | Capricorn:मंगळ तुमच्या राशीच्या सहाव्या घरात प्रवेश करेल. नोकरीत गुप्त शत्रूंवर विजय मिळवाल. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. व्यवसायातही प्रगती होईल, पण विचार करून निर्णय घ्यावे लागतील. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. आरोग्यही ठीक राहील.
मीन राशी | Pisces: तुमच्या राशीच्या चौथ्या घरात मंगळाचे गोचर शुभ राहील. या काळात तुम्ही स्थायी मालमत्ता किंवा प्रॉपर्टीतून चांगले पैसे कमवू शकाल. वाहन खरेदीची संधी मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसायात फायदा होईल. मात्र, कामाच्या ठिकाणी संयम आणि समजूतदारपणाने काम करावे लागेल. कुटुंबात कोणत्याही प्रकारचे वाद टाळा.
Edited by : Smita Joshi