काही लोक सुयोग्य असतात आणि लग्नासाठी प्रयास देखील करत असतात पण योग्य वेळेस त्यांचे लग्न ठरत नाही. या संबंधांबाबत ज्योतिष्याची अशी मान्यता आहे की ज्या लोकांच्या पत्रिकेत काही खास दोष असतात, म्हणून त्यांच्या लग्नात अडचणी येतात. तर जाणून घेऊ ते दोष कोण कोणते आहे.…
1. पत्रिकेच्या सप्तम भावात बुध आणि शुक्र दोन्ही भाव असतील तर लग्नाच्या गोष्टी सुरू असतात पण लग्नाला उशीर होतो.
2. पत्रिकेच्या चवथ्या भावात किंवा लग्न भावात मंगळ असेल, सप्तम भावात शनी असेल तर स्त्रीची रुची लग्नात नसते.
3. ज्या लोकांच्या पत्रिकेच्या सातव्या भावात शनी आणि गुरू असतात, तर त्यांच्या विवाहात उशीर होतो.
4. पत्रिकेत चंद्रापासून सातव्या भावात गुरू असेल तर लग्नात उशीर होतो. हीच गोष्ट चंद्राची राशी कर्काने देखील मानले जाते.
5. पत्रिकेच्या सातव्या भावात कुठले शुभ ग्रहांचा योग नसेल तरी देखील लग्न होण्यास उशीर होतो.
6. सूर्य, मंगळ आणि बुध लग्न भावात असेल आणि गुरु बाराव्या भावात असेल तर तो व्यक्ती आध्यात्मिक असतो आणि या मुळे त्याचे लग्न ठरण्यास उशीर होतो.
7. लग्न भावात, सप्तम आणि बाराव्या भावात गुरू किंवा कुठल्या शुभ ग्रहांचा योग नसेल आणि चंद्र कमजोर असेल तरी देखील विवाह जुळण्यास उशीर लागतो.
8. महिलेच्या पत्रिकेत सप्तम भावाचा स्वामी किंवा सप्तम भाव शनीने पिडीत असेल तरी देखील विवाह होण्यास उशीर होतो.
9. राहूच्या दशेत लग्न असेल किंवा राहू सप्तम भावाला पीडित करत असेल तर लग्न होऊन मोडले जाते, हे सर्व डोक्यातील भ्रमामुळे होते.