ऐसा दिस न घडो

बुधवार, 1 जुलै 2020 (10:56 IST)
हजारो वर्षांची परंपरा असलेली वारी आज चक्क त्यात कोरोनामुळे खंड पडलेला आहे विठ्ठरायाही कदाचित तुम्हा वर रागवला असणार कारण माणसात त्याला देव दिसतोय कुठ? साधू संतावर हल्ले होत आहेत पाप वाढत आहे मग तो कसा आपल्याला माफ करणार ? भविष्यात अस कधीच घडू नये पण माणवालाही खुप सुधराव लागेल पाप मुक्त व्हाव लागेल देव आता खालीच पापाचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडतो अन सध्या त्याने तशी परिस्थिती पण आपल्यासमोर उभी केलीय कोरोना होऊन मेलेल्यांचे काय हाल होतात ते ईश्वर दाखवतच आहे हा असा शनिच्या महादशेतील फेरा कुणाच चुकणार नाही शनि मंगळाचा गुरु केतुचा महा चांडाळ योग सध्या चालू आहे अन यातून कुणाचीच सुटका नाही ज्यांच्या तोंडी हरी नाम तोच ही नौका पार करणार नाहीतर शनिच्या फेर्यात अडकल्या शिवाय नाही राहणार विठ्ठुराया पण सध्या क्वारंटाईन झालाय त्यालाही लाल परीनं पंढरपुरला जाव लागतय.

लाखोंचा जन समुदाय वारीत चालत असे त्याबरोबर विठ्ठुराया पण चालत असे वारीतील सर्व वारकर्यांचा सहवास विठ्ठुरायालाही हवाहवासा वाटे  भक्तांतील हा विरहच सांगून जातोय की हा जगाचा तर अंत नसेल ना काल परवा जग बुडी होणार होती अस ज्योतिष म्हणत होते पण विधात्याला अजून येवढ्या सहजा सहजी नाही हे जग संपवायच असच हळू हळू महामारीत हे जग संपवणार विधाता पण असो आपल्याकडील काही असणारे दिवस बघता ईश्वराच नाम सतत आपल्या तोंडी असेल तरच आपण ईश्वराला जाऊन भेटू नाही तर महामारी तर काही सुटत नाही ती विष्णूच्या सुदर्शन चक्रासारखी मागेच असे अन आपल्याला पळवत राहील. 
विठ्ठला तुझा विसर न व्हावा हरी नाम सतत तोंडी असो.

वीरेंद्र सोनवणे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती