अखेर शनिवारी जोडे-चपला खरेदी करणे अशुभ का मानले गेले आहेत...

आम्ही आपल्या दैनिक जीवनात घडत असलेल्या संकेतावरून ओळखू शकतो की शनी देव आपल्यावर प्रसन्न आहेत वा रुष्ट. आपल्याला माहीतच असेल की शनीचा संबंध पायाशी देखील असतो.
 
कधी-कधी मंदिरात लोकांच्या चपला चोरीला जातात. तेव्हा वाईट वाटतं ही असेल कदाचित परंतू ही घटना आपल्यासाठी शनीचे शुभ संकेत देते अर्थात शनी आपला पिच्छा सोडणार असा अर्थ लावण्यात येतो.
 
तसेच जी व्यक्ती घरच्या आत जोडे-चपला घालून येते अशा घरात राहू आणि केतू सारखे कष्टकारी ग्रह देखील घरात प्रवेश करतात.
 
घराच्या मुख्य दारासमोर देखील जोडे-चपला ठेवू नये याने घरात नकारात्मकता प्रवेश करते.
 
शनीच्या अशुभ सावलीपासून वाचण्यासाठी शनीवारी काळ्या रंगाची चामड्याची चप्पल किंवा जोडे मंदिरात काढून तेथून मागे वळून न बघता परत आल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते.
 
फाटके आणि जुने जोडे घातल्याने शनीची अशुभ सावली आणि घरात दारिद्र्य येतं.
 
शनिवारी जोडे-चपला खरेदी करण्यावर मनाही आहे कारण शनीचा संबंध पायाशी असतो. शनिवारी जोडे-चपला खरेदी केल्याने शनी संबंधी पीडा घरात येऊ शकते त्यामुळे शनिवारी जोडे-चपला खरेदी करणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती