शनी जयंती: 1 वस्तू अर्पित केल्याने शनी देव होतील प्रसन्न

यंदा शनी जयंती 3 जून असून या दिवशी खास योग असल्याने साडेसाती, शनीची ढय्या किंवा महादशा यामुळे परेशान लोकांचे कष्ट नेहमीसाठी दूर होऊ शकतात. 
 
सूर्य पुत्र शनी हे न्याय दैवत आहे आणि सर्व 9 ग्रहांमध्ये शनी ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. शनी जयंतीला शनी देवाला प्रिय काळ्या वस्तू जसे काळी उडीद, काळे कपडे इतर अर्पित करावे.
 
या व्यतिरिक्त शनी जयंतीला एखाद्या मंदिर बसून शनी स्रोताचे पाठ करणे उत्तम ठरेल. याने शनी देव प्रसन्न होतील. शनिवारी पिंपळाच्या झाडावर शनीदेवाच्या मूर्तीजवळ तेल चढवावे आणि 
 
नंतर ते तेल गरिबाला दान द्यावे. शनिवारी काळे तीळ आणि गूळ मुंग्यांना खाऊ घालावे. याने शनीदेव प्रसन्न होतील.
 
या प्रकारे करा पूजन 
या दिवशी पूर्ण रूपाने पुण्य कमावण्यासाठी सर्वप्रथम स्नानादिहून शुद्ध होऊन एका लाकडीच्या पाटावर काळा कपडा पसरवून त्यावर शनीची मूर्ती किंवा फोटो किंवा एक सुपारी ठेवावी. त्याच्या 
 
दोन्ही बाजूला शुद्ध तुपाचा व तेलाचा दिवा लावून धूप जाळावे. शनी स्वरूप प्रतीकाला जल, दुग्ध, पंचामृत, तूप, अत्तर याने स्नान करवावे. नंतर इमरती, तेलात तळलेल्या खाद्य पदार्थाचा 
 
नैवेद्य 
 
दाखवावा. नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यांच्यावर अबीर, गुलाल, शेंदूर, कुंकू आणि काजल अर्पित करून निळे किंवा काळे फुलं अर्पित करावे. नैवेद्य अर्पण करून फळं आणि श्रीफळ अर्पित करावे.
 
शनीदेव प्रसन्न होतील या 8 वस्तूंमुळे
 
1. काळे तीळ 
2. तेल
3. काळे वस्त्र 
4. गूळ 
5. काळी उडीद 
6.‍ निळे फुलं 
7. इमरती 
8. गोड गुलगुले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती