वाईट स्वप्न काय सांगतात?

ND
ज्योतिष शास्त्रात स्वप्नांचा सरळ संबंध आमच्या भविष्याशी असतो. स्वप्नांमध्ये बरेचसे संकेत लपलेले असतात. तेच कारण आहे की स्वप्न आमच्या जीवनाशी सरळ संबंध ठेवतात.

ज्योतिषानुसार स्वप्न चार प्रकारचे असतात. पहिला दैविक, दुसरा शुभ, तिसरा अशुभ आरी चौथा चवथा मिश्रित.

दैविक स्वप्न : हे स्वप्न आम्हाला भविष्यात होणाऱ्या कार्यांची सूचना देतात.

शुभ स्वप्न: या स्वप्नात संकेत लपलेले असतात की तुमचे कार्य संपन्न होणार आहे की नाही.

अशुभ स्वप्न: स्वप्न कार्यात अपयश होण्याचे संकेत देतात.

मिश्रित स्वप्न: मिश्रित स्वप्न फलदायक असतात. जर आधी अशुभ स्वप्न दिसतील आणि नंतर शुभ स्वप्न दिसले तर शुभ स्वप्नांचे फळ आधी मिळतात.

वाईट स्वप्न बघून जर व्यक्ती परत झोपून जाईल किंवा लगेचच त्या स्वप्नाबद्दल कोणाशी चर्चा करेल तर त्याचे वाईट परिणाम दिसत नाही. सकाळी उठून महादेवाला नमस्कार करून स्वप्न फळ निवृत्तीसाठी प्रार्थना करावी. तुळशीच्या रोपाला पाणी घालून त्याच्या समोर आपले स्वप्न सांगावे व गुरुला स्मरण करावे. हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे फळ नष्ट होतात. झोपण्या अगोदर भगवान शिव, श्रीराम, श्रीकृष्णाचा स्मरण करावा. तसेच गायत्री मंत्राचा जप करावा. हे केल्याने वाईट स्वप्न येत नाही.

वेबदुनिया वर वाचा