World Milk Day 2024 : विश्व दूध दिवस का साजरा केला जातो, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

शनिवार, 1 जून 2024 (09:05 IST)
World Milk Day 2024 : दुधाचे सेवन शरीरासाठी बरेच फायद्याचं ठरतं. दुधामधून अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ मिळतात. दुधाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि ते व्यर्थ जाऊ देऊ नये म्हणून दरवर्षी 1 जून हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. आजही भारतात असे बरेच लोक आहेत ज्यांना दूध मिळत नाही, यामुळे त्यांच्या शरीरात पोषणाचा अभाव आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक दूध दिनाचे महत्त्व.
 
जागतिक दूध दिनाचा इतिहासः
हा दिवस 2001 या वर्षी साजरा करण्यास सुरुवात झाली. याची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या मंत्रालयाने सुरू केली. जागतिक दूध दिन यात गेल्या काही वर्षात 70 पेक्षा जास्त देश सहभागी होत आहे. या देशांमध्ये दुधाचे महत्त्व समजण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. 26 नोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो.
 
दुधात आढळतात हे पोषक घटक:
दुधात पुष्कळ पोषक द्रव्ये आढळतात जी शरीरासाठीही खूप महत्वाची असतात. दुधात व्हिटॅमिन-ई, डी, के आणि ए आढळतात. शिवाय, मॅग्नेशियम, आयोडीन, फॉस्फरस, कॅल्शियम, राइबोफ्लेविन देखील दुधात आढळतात, म्हणून लहानपणापासूनच दुधाचे सेवन मुलांसाठी खूप फायदेशीर आहे आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी देखील हे आवश्यक आहे.
 
का साजरा करतात हा दिवस
हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरात दुधाला जागतिक आहार म्हणून मान्यता देणे. लोकांना वाटते की दुध फक्त मुलांच्या आरोग्यासाठीच आवश्यक असते आणि मोठ्यांना याची फारशी गरज नसते पण तसे नाही. दूध प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. लोकांना आहारात दुधाचा समावेश करणे महत्वाचे आहे हे पटवून देण्याचेही प्रयत्न केले जातात कारण हे पिण्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. यासह हा दिवस साजरा करण्याचा हेतू डेयरी किंवा दुधाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात स्थिरता, उपजीविका आणि आर्थिक विकासास प्रोत्साहन देणे आहे.

Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती