लाल रंग पाहून बैल का चिडतो? का धावू लागतो?

वाटेत बैल दिसला तर आम्ही लगेच आपल्या कपड्यांकडे बघतो की कुठे लाल रंग तर घातलेला नाही. कारण लाल रंग बघून बैल रागाच्या भरात आम्हाला मारायला येयचा. लाल रंगाचे कपडे घातले तर वाटेत एखादा  बैल आपल्याला मारायला येईल ही भीती लहानपणापासूनच आपल्या मनात रुजवली जाते कारण लाल रंग पाहून बैलाला राग येतो तो चिडतो अशी समजूत आहे.
 
खरं तर ही केवळ एक मिथक आहे, त्याच्या प्रसारामागील कारण म्हणजे बैलांसोबत खेळला जाणारा खेळ. अनेक देशांमध्ये विशेषत: स्पेनमध्ये बैलांची लढाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या या खेळात बैलाला लाल रंगाचे कापड दाखवून चिथावणी दिली जाते. पण प्रत्यक्षात लाल कपड्याचा लाल रंग नसून कापड ज्या पद्धतीने हलवले जात आहे ते पाहून बैलाला राग येतो.
 
हे जाणून घेण्यासाठी डिस्कव्हरी चॅनलच्या मिथ बस्टरने एक चाचणीही घेतली होती. या चाचणीत त्यांनी तीन वेगवेगळ्या रंगांचा (लाल, निळा आणि पांढरा) वापर केला. बैलाने कोणताही भेदभाव न करता तिन्ही रंगांवर हल्ला चढवला.
 
शेवटी त्यांनी लाल पोशाख घातलेल्या एका माणसाला रिंगमध्ये आत सरळ उभे केले आणि त्याच्याबरोबर आणखी दोन पुरुष (काउबॉय) रिंगच्या आत ठेवले जे रिंगच्या आत फिरत राहिले. बैल सक्रिय काउबॉयच्या मागे पळत गेला आणि लाल कपडे घातलेल्या सरळ उभ्या असलेल्या माणसाला सोडून गेला.
 
या चाचणीने हे सिद्ध केले की बैल हे इतर गुरांप्रमाणेच रंगहीन असतात आणि लाल रंगाकडे त्यांच्या चिडचिड होण्याचे एकमेव कारण म्हणजे लाल रंगाचे कापड हलवले जाते. बैलासमोर ज्या प्रकारे लाल कापड सतत हलवण्यात येते, ते पाहून तो संतापतो आणि कापड हलवणाऱ्या व्यक्तीकडे धावतो.
 
कपड्याचा रंग लालच का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं कारण या क्रूर खेळाच्या शेवटी बैलाच्या रक्ताचे शिंतोडे लपवणे असं असू शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती