कबीर दोहे मराठी अर्थासहित

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (15:31 IST)
काल करे सो आज कर, आज करे सो अब । 
पल में प्रलय होएगी,बहुरि करेगा कब ॥
कबीर दास जी म्हणतात की कोणतेही कार्य उद्यावर टाळू नये, जे करायचे आहे ते आजच करावे आणि ते आत्ताच या क्षणी करावे. कुणालाच ठाऊक नाही, पुढच्या क्षणी प्रलय आलं तर आयुष्य संपेल, मग जे करायचं ते कधी करणार.
 
ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोये। 
औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए।।
कबीर दास जी म्हणतात की दुसर्‍यांच्या प्रती कठोर वाणीचा प्रयोग करु नये. दुसर्‍यांना सुख देणारी वाणी बोलावी ज्याने आपल्या मनालाही शांती मिळते.
 
निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय । 
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय ।।
कबीर दास जी म्हणतात की जे तुमच्यावर टीका करतात त्यांना नेहमी सोबत ठेवावे. कारण ते लोक तुमचे दोष तुमच्यासमोर ठेवतात, ज्या सुधारून तुम्ही नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
 
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय ।
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।। 
कबीर दास जी म्हणतात की या जगात कोणालाच खरे ज्ञान किंवा अंतिम सत्य केवळ पुस्तके वाचून मिळू शकत नाही, यासाठी फक्त प्रेमाची अडीच अक्षरे पुरेशी आहेत.
 
बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर । 
पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर ।।
कबीर दास जी म्हणतात की मानवी जीवनाचे उद्दिष्ट परोपरकार असले पाहिजे. जसे खजुराचे झाड उंच वाढले तरी ते प्रवाशाला सावली देत ​​नाही आणि त्याची फळेही दूरवर असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती