Guru Nanak Dev Quotes गुरु नानक यांचे अनमोल वचन

सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (16:13 IST)
1. गुरु नानकांच्या मते, देवाला हजारो डोळे आहेत आणि तरीही एक डोळा नाही. भगवंताची हजारो रूपे असूनही ती निराकार आहे.
 
2. गुरू नानकजी म्हणतात की तुम्ही जे काही पेराल, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
 
3. जेव्हा शरीर घाण होते तेव्हा आपण ते पाण्याने स्वच्छ करतो. त्याचप्रमाणे मन मलिन झाल्यावर भगवंताच्या नामस्मरणाने आणि प्रेमानेच ते शुद्ध होऊ शकते.
 
4. सर्व मानव एक आहेत, ना हिंदू ना मुस्लिम. सर्व समान आहेत.
 
5. नानकजी म्हणतात - फक्त तीच वाणी बोला, जी आपल्याला सन्मान मिळवून देईल.
 
6. हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
 
7. देवाच्या मर्यादा संपूर्ण मानवजातीच्या कल्पनेपलीकडच्या आहेत.
 
8. सत्य जाणून घेणे हे इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठे आहे आणि त्याहूनही मोठे सत्यासोबत जगणे.
 
9. भगवंताची प्राप्ती गुरूमुळेच शक्य आहे, म्हणून गुरूंचा आदर आणि उपासना करा.
 
10. दुसऱ्यांचे हक्क हिसकावून घेणार्‍याला कुठेही मान मिळत नाही. त्यामुळे कोणाचाही हक्क हिरावून घेऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती